पालघर । पालघरमधून बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला असून यात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघरच्या मनोर विक्रमगड रोडवर शनिवारी (३० डिसेंबर) बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. मनोर विक्रमगड रोडवर बोरांडा येथे भरधाव डंपरने बसला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसमधील दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर १५- २० प्रवासी गंभीर जखमी झाले.
यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावितही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ जखमींना मदत करत उपचारासाठी रुग्णालयात हालवले. अपघातात जखमी झालेल्यांपैकी काही जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एसटी बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
दरम्यान, आज (शनिवार, ३० डिसेंबर) सकाळी रायगडमध्ये पुण्याहून कोकणकडे सहलीला निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला. ५७ प्रवाशांना घेऊन सहलीला निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५५ जण जखमी जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.















Discussion about this post