भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (दि. 10) युद्धबंदी जाहीर झाली. मात्र अवघ्या तीन तासांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने पुन्हा एकदा आपले ‘नापाक’ मनसुबे दाखवले आहेत.पाकिस्तानने फक्त तीन तासांत शस्त्रसंधीचा भंग केला. पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यामुळे भारताने कठोर इशारा दिला आहे. केंद्र सरकारने भारतीय लष्कराला कारवाई करण्याचे आणि सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानच्या विश्वासघातावर नाराजी व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला.
पाकिस्तानने भारताला फोन करत शस्त्रसंधीबाबत चर्चा केली होती. भारतानेही शस्त्रसंधीसाठी होकार दिला होता. पण पाकड्यांनी फक्त तीन तासांतच सीमेवर पु्न्हा गोळीबार सुरू केला. त्यामुळे भारताने पाकिस्तानला कडक इशारा दिला. त्याशिवाय शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचे आदेश लष्कराला दिले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचा बुरखा फाडला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० मे २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता शस्त्रसंधी करार झाला होता. मात्र, अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने जम्मू-काश्मीर ते गुजरातपर्यंत ड्रोन हल्ले आणि गोळीबार करून कराराचा भंग केला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पाकिस्तानच्या कृतीला “निंदनीय” म्हटले. त्यांनी पाकिस्तानला तत्काळ असे हल्ले थांबवण्याची आणि जबाबदारीने वागण्याची इशारा दिला.
भारतीय लष्कराला सीमेवर कोणत्याही उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानने श्रीनगर, जम्मूसह अनेक ठिकाणी ड्रोन पाठवले आणि स्फोट घडवले. भारताने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केली. यामुळे सीमेवर तणाव वाढला असून, भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
Discussion about this post