जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी दहशताद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लष्कर-ए-तोयबाची संलग्न संघटना असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. यासोबतच या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड देखील सापडला आहे, ज्याचे नाव सैफुल्ला खालिद असल्याचे सांगितले जात आहे, ज्याला सैफुल्ला कसुरी असेही म्हणतात. हा सैफुल्लाह खालिद नेमका कोण आहे ते जाणून घेऊयात.
सैफुल्लाह खालिद कोण आहे?
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दहशतवाद्यांनी लोकांना त्यांची नावे आणि धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या. रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या संघटनेचा उपप्रमुख सैफुल्लाह खालिद हा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या सैफुल्लाहचे हाफिज सईदशीही संबंध आहेत आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचे नाव सामील आहे. सैफुल्लाह खालिदला पाकिस्तानकडून पूर्ण पाठिंबा मिळतो आणि त्याचे तेथील सैन्याशीही चांगले संबंध ठेवतो अशी माहिती समोर आली आहे. तसेच तो पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरतो आणि जिहादी भाषणे देखील देतो अशी माहितीही समोर आले आहे.
सैफुल्लाह खालिदला पाकिस्तानचा पाठिंबा
सैफुल्लाह खालिदला पाकिस्तानकडूनही पूर्ण पाठिंबा मिळतो. सैफुल्ला खालिदचे पाक सैन्याशीही चांगले संबंध असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर पाक सैन्याला भडकावण्याचा आणि तरुणांचे ब्रेनवॉशिंग करण्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफुल्लाह खालिदला दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या पंजाबमधील कंगनपूर येथे जिहादी भाषण देण्यासाठी पाक सैन्याने बोलावले होते अशीही माहिती समोर आली आहे.
Discussion about this post