पाचोरा । गेल्या महिन्यात पाचोरा येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार येणार होते. मात्र हा दौरा स्थगित झाला होता. आता शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचा पाचोरा दौरा निश्चित झाला आहे. पाचोरा शहरात ९ सप्टेंबर रोजी तिघेही मान्यवर येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
९ रोजी शहरातील भडगाव रोडवरील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे अन्य मंत्री जिल्ह्यातील आमदार, खासदार यावेळी उपस्थित राहणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
या “शासन आपल्या दारी” योजनेचा लाभ घेण्यासाठी सुमारे २५ हजार लाभार्थी उपस्थित राहणार असुन औद्योगिक वसाहत, ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, ५ कोटी रुपयांचे ऑक्सिजन पार्क (जॉगिंग ट्रॅक) भुमिपुजन, गिरड रोडवरील काकनबर्डी येथील परिसर सुशोभीकरणाचे भुमिपुजन, क्रिडा संकुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल.
Discussion about this post