पाचोरा : शहरातील मोंढाळे रोड वरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जितेंद्र राजु राठोड (वय – १९) व साक्षी सोमनाथ भोई – (वय -१८)असं मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
याबाबतची माहिती मिळताच पाचोरा शहरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक वसावे, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे यांनी धाव घेत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले.
साक्षीचे 23 जून रोजी लग्न झाल्याने ती सासरी गेल्यानंतर पुन्हा रविवारी माहेरी पाचोरा येथे आली होती. मध्यरात्री तरुण विवाहिता घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा शोध सुरू असतानाच घराच्या मागील बाजूस अंगणवाडीत दोघेही जण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर कुटूंबियांना मोठा धक्काच बसला.
मयत साक्षी भोई हिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पती असा परीवार आहे तर मयत जितेंद्र राठोड यांच्या पश्चात आई-वडील व तीन बहिणी असा परीवार आहे. जितेंद्र राठोड याचा परीवार मोलमजुरी करतो तर साक्षी भोईचा परीवार मासे विक्री करून उदरनिर्वाह करतो. दोघेही परीवार शहरातील एकाच भागातील रहिवासी आहेत. दरम्यान, जितेंद्रने बारावीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झाला आहे. दोघांच्या मृत्यूमुळे पाचोरा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Discussion about this post