जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील खेडगावचा जवान लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी कर्तव्यावर रवाना झाला आहे. देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना सैन्य दलाकडून त्वरित बोलावणे आले आहे. त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक आज ८ मे रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला असून ते रवाना झाले आहेत.
पाचोरा तालुक्यातील नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोजचे लग्न ठरले. लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आले होते.
५ मे रोजी मनोज यांचं लग्न पार पडलं. मात्र लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी मनोज यांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणे आले. कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागत असल्याने माझ्या मुलाचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या वडिलांनी दिली आहे. देशापेक्षा मोठे काहीही नाही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीने दिली आहे.
Discussion about this post