पाचोरा । राज्यात बसचे अपघात काही थांबण्याचे नाव घेत नसून अशातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यात त्यात १३ विद्यार्थी बसचालकासह २० जण जखमी झाल्याची घटना पाचोरा- मोंढाळा रस्त्यावर मौनगिरी साखर कारखान्यासमोर घडली
पाचोरा आगाराची घोसला ते पाचोरा ही मुक्कामी बस प्रवासी व विद्यार्थी घेऊन पाचोऱ्याकडे येत होती. या दरम्यान पाचोरा शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर सकाळी सव्वा सहाचे सुमारास समोरून येणाऱ्या ट्रकवर समोरासमोर धडकली. अरुंद व खराब रस्ते असल्याने बस व ट्रकचा वेग कमी असल्याने अनर्थ टळला.
मुक्कामी असलेल्या बसने वाडी, शेवाळे, सातगाव डोंगरी, सातगाव तांडा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने पाचोरा येथे आवागमन करतात. १३ विद्यार्थी व ७ प्रवाशी असे २० प्रवासी या बसमध्ये होते. बस व ट्रक अपघाताचे वृत्त शहरासह तालुक्यात पसरल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक, कमालीचे भयभीत झाले व त्यांनी लगबगीने अपघातस्थळ गाठले. तसेच शैक्षणिक संस्थांचे चालक, विविध शाळातील शिक्षक, सेवाभावी संस्था संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनीही घटनास्थळी व नंतर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतल्याने प्रचंड गर्दी व गोंगाट झाला.
बसमधील जखमी विद्यार्थी असे
स्वराज पाटील, विवेक राठोड, गोपाल चव्हाण, नीता राठोड, रोशन परदेशी, सुमित नलवाडे, दीपक पवार, जतीन महाले, पूजा मनगटे प्रतिभा राठोड, रोशनी चव्हाण, ज्योती चव्हाण, पुष्कर पाटील, दिनेश राठोड व दिनेश चव्हाण.
Discussion about this post