पाचोरा : पाचोरा शहरातील जवान चेतन हजारे यास मिझोराम येथे देशसेवा बजावताना 15 जून रोजी रात्री 10 वाजता वीरमरण आल्याची दुःखद घटना घडली. या घटनेने शहीद जवान हजारे यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पाचोरा शहरातील देशमुखवाडी भागातील रहिवासी असलेला चेतन हजारे हा विवाहित तरुण मिझोराम येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होता. देशसेवा बजावताना 15 जून शनिवार रोजी रात्री 10 वाजता त्यास वीरमरण आले. सुमारे 10 वर्ष त्याने देशसेवा बजावल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान या जवानाचे पार्थिव उद्या, 17 जून रोजी सकाळी 6 वाजता त्यांचे पार्थिव पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथे आणले जाणार आहे. यानंतर सकाळी 9 वाजता त्याचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने पाचोरा शहरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.
त्याचे पश्चात आई, वडील, एक बहीण, जावई, पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
Discussion about this post