पाचोरा । पाचोरामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीवर तीन वेळा अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक उघडकीस आल्यानंतर एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असं कि, पाचोरा शहरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिच्या घराच्या परिसरात राहणारा तुषार वसंत गायकवाड याने पीडित मुलीवर तीन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गर्भवती राहिलीचा धक्कादायक घटना समोर आली. त्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीसह तिच्या आईने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.
त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रविवारी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तुषार गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे.
Discussion about this post