नवी दिल्ली | तुम्हीही जर नवीन बँक खाती उघडत असाल तर ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळणार की नाही, हे अगोदर विचारुन घ्या. ओव्हरड्राफ्टची सुविधा जवळपास सर्वच बँका देतात. पैशांची गरज कधी आणि केव्हा पडेल हे सांगणे कठीण आहे. यामुळे अडचणीच्या काळात तातडीने रक्कम लागल्यास या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा तुम्हाला लाभ घेता येतो. आज आम्ही तुम्हाला खात्यात पैसे नसले तरी 10 हजारांचा फायदा कसा मिळू शकतो हे सांगणार आहोत.
ज्या ग्राहकांकडे जनधन खाते आहे. त्यांना ही सुविधा मिळते. ओव्हरड्राफ्ट हे एक प्रकारचे कर्ज असते, बँक ते ऑफर करते. पण या कर्जासाठी तुम्हाला अर्जफाटा करावा लागत नाही. अथवा कोणत्याही बँकेत जावे लागत नाही. ओव्हरड्राफ्ट वा OD ची सुविधा तुम्हाला लागलीच मिळते. तुम्ही कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकता. अर्थात या सुविधेत तुम्हाला किती रक्कम काढता येते, हे अगोदरच निश्चित असते.
तुमच्याकडेही जर जनधन खाते असेल तर ओव्हरड्राफ्ट अंतर्गत त्यांना 10,000 रुपये मिळतात. ही रक्कम त्या व्यक्तील डेबिट कार्ड आधारे एटीएममधून काढता येते. या सुविधेतंर्गत तुमच्या खात्यात शुन्य बँलेन्स असले तरी रक्कम काढता येते. जनधन खात्यातर्गंत एक नवीन पैसा जरी खात्यात नसला तरी 10,000 रुपये काढता येतात. ही रक्कम नंतर ठराविक व्याजासह परत करता येते. काही बँका या दहा हजार रक्कमेपेक्षा पण अधिकची रक्कम पण ओव्हरड्राफ्ट म्हणून देतात. पण त्यासाठी मिनिमम बँलन्स मेंटेन करावे लागते. जनधन खातेधारांन ओव्हरड्राफ्टवर 2 ते 12 टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागू शकते. अर्थात व्याजदर हा प्रत्येक बँकेवर आधारीत असतो. पण व्याजाचा दर 12 टक्क्यांपेक्षा अधिक नसतो.















Discussion about this post