धुळे । यंदाच्या खरीप हंगामात शिरपूर तालुक्यात बऱ्यापैकी पेरा कापसाचा झाला आहे. मान्सूनपूर्व कपाशीची लागवड जून महिन्यात येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र साधारण महिनाभराची पीक झाले असतानाच लागवडीनंतर पहिल्याच महिन्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाल्या रोगाचा प्रादुर्भाव सतावू लागला आहे. लाल्या रोग पडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून रोग घालवण्यासाठी फवारणी करत आहे.
दोन वर्षांपूर्वी झाली होती; त्या प्रमाणेच याही वर्षी काही शेतकऱ्यांच्या शेतातील दोन ते तीन आठवड्याची कोवळी कपाशी लाल व पिवळी पडून त्याची वाढ खुंटत आहे. कापसाचे महिनाभराचे पीक झाले असताना यामागे खराब वातावरण आहे की बियाण्याचा दोष याबाबत शेतकरी वर्गात गोंधळ उडाला आहे. हा रोग घालविण्यासाठी शेतकरी फवारणी करू लागला आहे.
अजून कोणत्याही शेतकऱ्याने कृषी विभागाकडे तक्रार केलेली नाही, परंतु दोन वर्षांपूर्वीप्रमाणे कापसाचे उत्पादन घटण्याची भीती आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
उपाययोजना करण्याची मागणी
दोन वर्षांपूर्वी पेरणी झाल्याच्या एक महिना कालावधीनंतर ठरावीक कपाशीचे वाण लालसर पडून खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना हे पीक उपटून टाकावे लागले होते. कृषी विभागाने पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवला होता. परंतु त्यावर कोणताही निर्णय झाला नाही किंवा मदत मिळाली नाही. तर आता यंदाही हंगामात कपाशीचे पीक रोगग्रस्त झाले आहे. यावर्षीची स्थिती पाहता कृषी विभागाने तातडीने या रोगाची पाहणी करून शेतकऱ्यांना उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.
Discussion about this post