जळगाव : उन्हाळ्यानंतर आता मान्सूनचे आगमन होईल. पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेत. त्यानंतर काही दिवसातच तो महाराष्ट्रात धडकेल. मान्सून पावसावर बरेच शेतकरी अवलंबून आहे. मान्सूनची चाहूल लागताच बरेच शेतकरी बियाणी अगोदरच खरेदी करून ठेवतात. मात्र शेतकऱ्यांनी बियाणे घेताना त्याचे बिल घ्यावे, त्याशिवाय बियाणे, खते खरेदी करू नये. यंदा बियाणे, खतांचा भरपूर स्टाक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात अंकुर सीड्स कंपनीचे स्वदेशी ५ हे वाण कोठेही उपलब्ध होणार नसल्याचे कंपनीने कळविले आहे. यामुळे हे वाण बोगस पद्धतीने विक्री होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी अशाप्रकारचे बियाणे विकत घेऊन स्वतःची फसवणूक करून घेऊ नये.
शेतकऱ्यांनी बियाणे घेताना त्याचे बिल घ्यावे, त्याशिवाय बियाणे, खते खरेदी करू नये. बिल नसल्यास संबंधितांवर नंतर कारवाई करता येत नाही. स्वदेशी ५ हे वाण कोणी विकताना आढळल्यास त्याच्यावर बियाणे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील.
बोगस बियाणे विक्री करण्यावर नजर ठेवण्यासाठी १६ भरारी पथकांची स्थापना केली आहे. अनधिकृतपणे बियाणे विक्री करताना कोणी आढळल्यास पंचायत समितीचा कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
जळगाव जिल्ह्यात कपाशीचा पेरा अधिक होत असल्याने यंदा २७ लाख ५० पाकिटे बीटीची मागविली आहेत. कपाशीचे पाकिटे डिलरपर्यंत पोचली असली, तरी बियाणे विक्री १ जूनला सुरू होणार आहेएकूण ४४ हजार ४३२ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.
Discussion about this post