जळगाव | जळगावचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकताच पदभार स्वीकारला. जळगाव जिल्हाधिकारी पदाची सूत्र हातात घेताच आयुष प्रसाद ऍक्शनमध्ये आले आहे.
माझा कारभार पारदर्शी व गतिमान असेल. वाळूमाफियांविरोधात कठोर कारवाई करू. महसूल अधिकाऱ्यांच्या वाहनांचा पाठलगा करणाऱ्यांवर ‘एमपीडीए’ लावण्याचा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिला. जिल्ह्यातील सर्वांना सारखी वागणूक दिली जाईल. विकासात्मक कामांवर भर देऊ. बेरोजगारांची संख्या अधिक आहे, त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन, स्कील ट्रेनिंग देऊ, असेही ते म्हणाले.
श्री. प्रसाद म्हणाले, की वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वाळूमाफियांचा बारीक अभ्यास करून अवैध वाळू उपशावर नियंत्रणासाठी एक समिती नेमणार आहे. जेसीबी, ट्रॅक्टर, बोटीद्वारे वाळू काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
सण-उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यावर प्रशासनाचा भर राहील. ‘एक गाव-एक गणपती’ची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येईल.
Discussion about this post