जळगाव । जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी, शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संख्या, जळगांव येथे दिनांक ०६ जुन २०२५ रोजी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन दूरदृष्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून जळगांव शहराचे आमदार सुरेश दासु भोळे, मिलींद बाऊल, व्हाईस प्रेसिडेन्ट पर्सनल जैन इरिगेशनसिस्टिम, लि. जळगांव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विवेक काटदारे कुटुंब प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सदर कार्यक्रमात नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. या कार्यक्रमासाठी जळगांव शहर व परिसरातील प्रतिष्ठित व सामाजिक शैक्षणिक दक्षेत्रातील सर्व मान्यवर हजर राहणार आहे. तसेच संस्थेतील माजी प्रशिक्षणार्थी व त्यांचे पालक यांना सुद्धा आमंत्रित केलेले आहेत . या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकिय औ. प्र. संस्था, जळगांव संस्थेचे प्राचार्य एन. व्ही. चव्हाण यांनी केले आहे.
Discussion about this post