जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अॅण्ड एम्पावरमेंट, नवीदिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २३ सप्टेंबर रोजी ‘ट्रान्सजेंडर आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता सामाजिकशास्त्रे प्रशाळेत होणाऱ्या या कार्यशाळेत सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची देखील उपस्थिती राहणार आहेत. एक दिवसीय कार्यशाळेत दोन सत्र होणार असून ‘ट्रान्सजेंडर आणि वृत्तपत्रांची भूमिका’ पहिल्या सत्रात दै. लोकमतचे संपादक किरण अग्रवाल, दै. दिव्य मराठीचे संपादक दीपक पटवे तर दुसऱ्या सत्रात दै. देशदूतचे संपादक हेमंत अलोने, दै. सकाळचे शहर प्रमुख सचिन जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेचा समारोप दु. ३.३० वाजता वित्त व लेखाधिकारी सीए. रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होणेसाठी नोंदणी अनिवार्य असून दि. २३ रोजी स. ९.३० ते १० या वेळेत विनामूल्य नोंदणी करता येईल. या कार्यशाळेस जिल्ह्यातील पत्रकारांनी आणि विद्यापीठ प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे राहण्याचे आवाहन माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक तथा मुख्य निमंत्रक प्रा.डॉ. सुधीर भटकर, सहनिमंत्रक डॉ. गोपी सोरडे, डॉ. सोमनाथ वडनेरे, अॅङ सूर्यकांत देशमुख यांनी केले आहे.
Discussion about this post