Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

२ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 27, 2024
in जळगाव जिल्हा
0
२ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्यामार्फत जळगाव जिल्ह्यातील युवक व युवतींच्या कलागुणांना संधी मिळावी यासाठी जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २ डिसेंबर २०२४ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी दिली. युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे यासाठी प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा विभागातर्फे करण्यात येते. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

२०२४-२५ या वर्षात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन हे विज्ञान व तत्रज्ञान या नवसंकल्पनावर आयोजित करावयाचे आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलयामार्फत करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान या संकल्पनेवर आधारीत प्रदर्शने, सांस्कृतिक स्पर्धा, लोकगीत, लोकनृत्य, कौशल्य विकास स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, वत्क्तृत्व स्पर्धा, कविता, हस्तकला, वस्त्रोद्योग व अॅग्रो प्रॉडक्ट व मोबाईल फोटोग्राफी अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. याच युवा महोत्सवाचा एक भाग म्हणजे जळगाव युथ आयकॉन- ज्या युवक/ युवतींनी सामाजीक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, तसेच नैसर्गिक आपत्ती, इतर आपत्कालीन परिस्थीतीत उल्लेखनिय कार्य केले असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

या युवा महोत्सवात १५ ते २९ वयोगटातील युवक व युवती सहभागी होऊ शकणार आहे . स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासनाद्वारे विविध पारितोषिके तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यातयेणार आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या युवक व युवती यांची विभागस्तरावर निवड करण्यात येणार व विभागस्तरावर प्राविण्य प्राप्त युवक युवती यांची निवड राज्यस्तरीय युवा महोत्सवाकरीता करण्यात येणार आहे. पुढे राष्ट्रीय युवा महोत्सवाकरीता प्राविण्य प्राप्त युवक व युवती यांची निवड केली जाईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सांगितले.

युवा महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील संगीत महाविद्यालय वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, महिला मंडळे, सांस्कृतिक मंडळ, जिल्ह्यातील इंजिनिअरिंग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था येथील १५ ते २९ वयोगटातील युवक व युवती यांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.

जळगाव जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या संस्था, मंडळ, वैयक्तिक युवक-युवती यांनी आपले प्रवेश अर्ज २८ नोव्हेंबरपर्यंत छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत जमा करायचे आहेत. विहीत मुदतीनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी ९८२३७७३७९७ आणि ८६२५९४६७०९ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा छ त्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कार्यलयीन वेळेत प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अखेर महायुतीचा मुख्यमंत्री ठरला! पंतप्रधान मोदींकडून यांच्या नावाला पसंती, लवकरच घोषणा

Next Post

मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह अन् मोदींसोबत फोनवर काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सगळं सांगितलं..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह अन् मोदींसोबत फोनवर काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सगळं सांगितलं..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page