जळगाव प्रतिनिधी । नेत्रदान, त्वचादान, देहदान याबाबत फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई, या सामाजिक संस्थेतर्फे जनप्रबोधन करणारी रथयात्रा काढण्यात आली आहे. ही रथयात्रा मंगळवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येणार आहे.
नाशिक ते आनंदवन अशी १४३० किलोमीटरची ही रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचच्ची जबाबदारी महाविद्यालयातील विद्याथ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने मंगळवारी दुपारी २ वाजता विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, सुनील देशपांडे, उपाध्यक्ष फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन मुंबई हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती विभागाचे संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी दिली.
Discussion about this post