नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी मार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार “सामान्य प्रवाह पदवीधर” आणि “पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) शिकाऊ” पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.29 जानेवारी 2025 पर्यंत ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील, असे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
पात्रता काय?
एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी यशस्वीरित्या पूर्ण केलेली असावी. वेतनाच्या बाबतीत, सामान्य प्रवाह पदवीधर (इंजिनियरिंग) आणि (नॉन-इंजिनियरिंग) उमेदवारांना दरमहा 9000 रुपये तर पदवीधर / तंत्रज्ञ (इंजिनियरिंग) उमेदवारांना दरमहा 8000 रुपये मिळेल.
अर्ज पद्धती आणि आवश्यक कागदपत्रे
अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा-जळगाव [एमएस]-425308 या पत्त्यावर अर्ज पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2025 आहे.
योमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 वर्षे असावे असे नमूद करण्यात आले आहे. उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावीत.
Discussion about this post