जळगाव । महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या 10वीच्या निकालानंतर आता 11 वीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. ११वीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी उद्या म्हणजेच १९ मेपासून सुरू होत आहे. शासनाने ही प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. ज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये ही ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. ऑनलाईन पोर्टलवर सध्या महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
यंदा शैक्षणिक वर्ष 2025-026 साठीची अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच होणार असल्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. शिक्षण संचालनालयाने या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून सोमवार, 19 मेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी आणि महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम भरता येईल, असे घोषित केले होते.
जळगाव शहरातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करावी लागेल. प्रत्येक विद्यार्थ्याला १० कॉलेज निवडून पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. याशिवाय दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीतून प्रवेश मिळणार आहे.
अर्ज कसा भरायचा ?
संकेतस्थळावर लॉगिन करून नवीन नोंदणी करा, पालकांची माहिती व इतर तपशील नोंदवा. दहावीचा निकाल अपलोड करा, १० कॉलेज पसंतीक्रमानुसार निवडा, कागदपत्रे अपलोड करावीत यानंतर ऑनलाइन फार्म सबमिट करून प्रिंट काढावी.
Discussion about this post