छत्रपती संभाजीनगर । लाचखोरीही डिजिटल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरातील एका वाहतूक पोलिसाने ५०० रुपयांची लाच फोन पेवरून घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसाने सिट बेल्ट न लावल्यामुळे एका कारचालकाला पकडले. त्यांना अडीच हजार रुपये दंड भरावे लागणार असल्याचे सांगितले. कारचालक शंभर रुपये देत होतो. तेव्हा शंभर रुपये नका देऊ, असे सांगताना वाहूतक पोलीस व्हिडिओत दिसत आहे. तुम्हाला अडीच हजार रुपये दंड सांगितला होता.
संभाजीनगरात वाहतूक पोलिसाने घेतली ऑनलाईन लाच… pic.twitter.com/39E7dkDGVI
— jitendra (@jitendrazavar) July 18, 2024
तुमचे अडीच हजार वाचवत आहे, पाचशे रुपये भरा. तो वाहनचालक पाचशे रुपये नसल्याचे म्हणतो. शेवटी पाचशे रुपये फोन पे वरून त्या पोलिसाच्या खात्यात जमा केले. अंबिका पान सेंटर या फोन पे अकाउंटवर वाहतूक पोलिसाने ही पाचशे रुपयांची लाच घेतली आहे. ते पैसे मिळाल्यावर वाहतूक पोलीस त्यांना यापुढे सिट बेल्ट लावत जा. नवीन गाडी घेतली असल्याचे सांगताना दिसत आहे. १ मिनिट ४६ सेंकदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई होणार? किंवा त्याची काहीच दखल घेतली जाणार नाही? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
Discussion about this post