नाशिक । राज्यात गेल्या काही महिन्यापासून कांद्याला चांगला भाव मिळाल्याचं पाहायला मिळाले. मात्र आता उन्हाळी कांदा संपला असून अनेक बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अचानक आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव गडगडले आहे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
मागील काही दिवसांपासून पाच हजाांपर्यंत गेलेला भाव प्रति क्विंटल ८०० ते १००० रुपयांनी घसरला आहे. सध्या लाल कांद्याची काढणी करण्यास सुरवात झाली आहे. गेल्या दोन- तीन लिलावांत लाल कांद्याला चांगले भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला होता.
दरम्यान नेप्ती उपबाजारात १ लाख ५६ हजार ८७६ इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा गोण्यांची आवक झाली. क्विंटलमध्ये हि आवक ८६ हजार २८१ इतकी होती. उपबाजारात हि आवक अजूनही सुरूच आहे. याठिकाणी दाखल झालेल्या उच्च प्रतीच्या लाल कांद्याला ३ हजार ३०० इतका भाव मिळाला. अशा ४१ कांदा गोण्या होत्या. तर लिलावात उच्च प्रतीच्या कांद्याला ४ हजार १०० इतका भाव होता. सोमवारी एक नंबरच्या लाल कांद्याला २ हजार ३०० ते ३ हजार इतका भाव
मिळाला. दोन नंबर कांदा १ हजार ५०० ते २ हजार ३००, तीन नंबर कांदा ९०० ते १५०० तर चार नंबर कांदा ३०० ते ९०० रुपये दरांवर आला आहे.















Discussion about this post