नाशिक । अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटामुळे कांद्याचे उत्पादन आधीच घटलंय. सध्या बाजारात येणाऱ्या लाल कांद्याची टिकवण क्षमता अवघ्या काही दिवसांचीचं असल्यानं कवडीमोल भावात कांदा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आलीये. कांद्याचे दर निम्म्याहून अधिक घसरल्यामुळे पुन्हा एकदा कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी जोर धरू लागलीय. एकट्या पिंपळगाव बाजार समितीत कांदा उत्पादकांना २२ कोटींचा फटका बसलाय.
गेल्या काही वर्षांपासून कांद्याचं रडगाणं सुरु आहे. कधी निर्यात बंदी तर कधी निर्यात शुल्काचा फटका कांदा उत्पादकांना बसतोय. सध्या कांदा पिकावर 20 टक्के निर्यात शुल्क आकारलं जातंय. त्यामुळे कांद्याची निर्यात मंदावली आहे. नाफेड आणि NCCF नं खरेदी केलेला कांदा आता बाजारात येतोय. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. नाशिक जिल्ह्यात तेरा दिवसांमध्ये दर दिवशी साडेसात कोटींचा फटका बसतोय.
पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात सुमारे दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. 30 क्विंटलच्या ट्रॉलीमागे शेतक-यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान झालं आहे. अशा नुकसानीनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं नाही तर नवल. कर्ज काढून कांदा लागवड केलेल्या सिन्नरच्या या शेतकऱ्यानं सत्ताधाऱ्यांना काय विनंती केली आहे पाहा.
दोन आठवड्यात असा घसरला कांद्याचा भाव
किमान कमाल सरासरी
9 डिसेंबर सोमवार7004,2763,400
11 डिसेंबर बुधवार5003,9013,000
16 डिसेंबर सोमवार5002,4941,950
18 डिसेंबर बुधवार4002,4001,500
19 डिसेंबर गुरुवार3002,1901,400
21 डिसेंबर शनिवार4002,3991,500
23 डिसेंबर सोमवार4002,1251,350
Discussion about this post