मुंबई । शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवकावर झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण राज्य हादरलं. दहीसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याच्यावर मॉरिस भाई याने गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी मेहुल नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
या घटनेनंतर मेहुल याचा शोध सुरू होता. अखेर रात्री उशीरा मेहुल पारेख याला ताब्यात घेण्यात आलं. या गोळीबारापूर्वी जे फेसबूक लाइव्ह करण्यात आलं होतं, त्यावेळी मॉरिस यांनी स्वत:च मेहुल इज हिअर, असं जाहीर केलं होतं. त्यावेळी मोबाईलच्या मागे मेहुल नावाची व्यक्ती होती, हे स्पष्ट झालं होतं. गोळीबाराच्या या घटननंतर मेहुल पारेख घटनास्थळावरून फरार झाला होता. अखेर रात्री उशीरा त्याला ताब्यात घेण्यात आलं.
मात्र ते फेसबूक लाइव्ह सुरू असताना, घटनास्थळी मेहुल नेमका काय करत होता, तो का आला होता तसेच या सगळ्या गोळीबाराच्या घटनेपूर्वी नेमकं काय काय झालं, याची माहिती मिळवण्यासाठी पोलिस मेहुलची चौकशी करत आहेत.















Discussion about this post