जळगाव । लग्नाच्या सिझनमध्ये जर आज तुम्ही सोनं खरेदी करायला जाणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. कारण आजच्या दिवशी पुन्हा सोन्याचे भाव वाढले आहेत.
या आठवड्याची सुरुवात सोनं करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली झाली होती. कारण सुरुवातीच्या दिवसात सोनं स्वस्त झालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा सोने दरात वाढ झाली. Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज १७ मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,250 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,600 मिळेल.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 82,500 एवढा आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 89,990 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 71,992 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,999 रुपयांनी विकलं जात आहे.
जळगावमधील भाव
22 कॅरेट सोनं – 8,235 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,984 रुपये
Discussion about this post