नवी दिल्ली । लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांची निवड झाली. भाजपकडून दुसऱ्यांदा या पदावर निवड होणारे बिर्ला हे पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ओम बिर्ला तर इंडिया आघाडीने काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांना मैदानात उतरवले. यात बिर्ला हे निवडून आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी यांच्या भाषणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
यावेळी राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना अभिनंदन करताना इशाऱ्यातून सरकारवर पण हल्लाबोल केला. आज सरकारकडे बहुमत आहे. संख्याबळ आहे. पण विरोधक, इंडिया आघाडी हे जनतेचा आवाज असल्याचे ते म्हणाले. संख्याबळावर विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही, असे संकेत त्यांनी दिले.
मला आशा आहे की, लोकसभा अध्यक्ष जनतेचा आवाज लोकसभेत उठवू देतील. विरोधकांचा आवाज दाबणे हे लोकशाहीविरोधी असल्याचे ते म्हणाले. त्यांना चूप बसवून संसदे चालवू शकत नाही. विरोधक सरकारसोबत सहकार्य करु इच्छित आहे. पण आम्हाला बोलण्याची संधी, आमची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी असे त्यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post