सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सरकारी कंपनीत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी इन्श्युरन्स कंपनी (OICL) मध्ये भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
या नोकरीसाठी एकूण ५०० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया उद्या म्हणजेच २ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी उद्यापासून अर्ज करावेत. चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.
इन्श्युरन्स कंपनीत नोकरी करण्याची संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी आधी अधिसूचना वाचा त्यानंतर पात्रकेनुसार अर्ज करावेत.
या नोकरीसाठीची अर्जप्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. तुम्हाला orientalinsurance.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. उमेदवारांची दोन टप्प्यांमध्ये परीक्षा होणार आहे. ही परीक्षा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते.
या नोकरीसाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत १२वीत ६०पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावे. तसेच उमेदवारांना त्यांच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी अधिसूचना आज जाहीर केली आहे.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना orientalinsurance.org.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर Apply Online वर क्लिक करा.
New Registration या ऑप्शनवर क्लिक करुन सर्व माहिती भरा.
यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे.
आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड करायचा आहे.
यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवा.
Discussion about this post