कल्याण । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस तसेच निवडणूक आयोगाच्या पथकाकडून ठीक ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात असून याच दरम्यान आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. अशातच आयकर विभागाने कल्याणमध्ये ५ कोटींची रोकड ताब्यात घेतली.
कल्याण शीळ फाटा रोडवर कोट्यवधींची रोकड पकडण्यात आली आहे. या रोडवर पाच कोटींहून अधिक रक्कम असल्याची माहिती मिळाली आहे. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या वाहनात रोकड आढळली आहे. रोकडबाबत माहिती पुरावे देऊ न शकल्याने भरारी पथकाने रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात दिली. ऐन विधानसभा निवडणुकीत कोट्यवधींची रोकड सापडल्याने मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.















Discussion about this post