Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

देशभरात 1 ऑक्टोबर ‘हे’ 7 मोठे बदल लागू होणार ; तुमच्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 29, 2025
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
देशभरात 1 ऑक्टोबर ‘हे’ 7 मोठे बदल लागू होणार ; तुमच्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या..
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : कोणताही नवीन महिना नवे बदल घेऊन येत असतो. त्याचनुसार ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून, देशभरात ७ मोठे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर आणि दैनंदिन जीवनावर होईल. हे बदल ऑनलाइन गेमिंगपासून ते रेल्वे तिकीट बुकिंग, UPI आणि पेन्शन योजनांपर्यंतच्या नियमांशी संबंधित आहेत. १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणाऱ्या या बदलांचा तुमच्यावर परिणाम कसा होईल, हे जाणून घेऊया…

१. नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये मोठे बदल

१ ऑक्टोबर २०२५ पासून नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये मोठा बदल होणार आहे. गैर-सरकारी क्षेत्रातील सदस्यांना मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) खाली इक्विटीमध्ये १००% पर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी असेल. याचा अर्थ, १ ऑक्टोबर पासून NPS चे बिगर-सरकारी सदस्य पेन्शनची संपूर्ण रक्कम शेअर बाजाराशी संबंधित योजनांमध्ये गुंतवू शकतील. यापूर्वी, इक्विटीमधील गुंतवणुकीची मर्यादा ७५% होती.

यासोबतच, सरकारी क्षेत्राप्रमाणेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडूनही पीआरएएन (PRAN – Permanent Retirement Account Number) उघडण्यासाठी ई-पीआरएएन (e-PRAN) किटसाठी १८ रुपये आणि फिजिकल पीआरएएन कार्डसाठी ४० रुपये शुल्क आकारले जाईल. यामध्ये वार्षिक देखभाल शुल्क प्रति खाते १०० रुपये असेल. अटल पेन्शन योजना (APY) आणि NPS लाइट सदस्यांसाठी पीआरएएन उघडण्याचे शुल्क आणि देखभाल शुल्क १५ रुपये असेल, तर व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही.

२. रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम अधिक कडक

रेल्वे तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहार थांबवण्यासाठी १ ऑक्टोबरपासून महत्त्वाचे बदल होणार आहेत. आरक्षण सुरू होण्याच्या पहिल्या १५ मिनिटांत केवळ तेच प्रवासी ऑनलाईन तिकीट बुक करू शकतील, ज्यांचे आधार वेरिफिकेशन झालेले आहे. रेल्वेचे अधिकृत एजंट आरक्षण उघडल्यानंतर पहिल्या १० मिनिटांपर्यंत तिकीट बुक करू शकणार नाहीत. या बदलांचा उद्देश तिकीट बुकिंगचा लाभ खऱ्या वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवणे आहे.

३. ऑनलाईन गेमिंग विधेयकाची अंमलबजावणी

ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनावर आणि आर्थिक नुकसानीवर नियंत्रण ठेवण्यासाठी Online Gaming Bill 2025 १ ऑक्टोबरपासून लागू होईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १ कोटी रूपयांचा दंड होऊ शकतो. तर प्रमोटर्सना दोन वर्षांची शिक्षा आणि ५० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. यामुळे ‘रिअल मनी गेमिंग’ उद्योगावर मोठे नियमन येईल.

४. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार?

१ ऑक्टोबरपासून तेल विपणन कंपन्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करू शकतात. याचा थेट परिणाम तुमच्या महिन्याच्या स्वयंपाकघरातील बजेटवर होईल. यासोबतच एटीएफ (ATF), सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) च्या दरातही बदल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल केला होता, तर १४ किलोग्रॅमच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता.

५. UPI मधून P2P व्यवहार हटण्याची शक्यता

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे १ ऑक्टोबर २०२५ पासून UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) मध्ये मोठे बदल लागू होतील. वापरकर्त्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे पीअर-टू-पीअर (P2P) व्यवहार (जे दोन व्यक्तींमध्ये केले जातात) UPI ॲप्समधून हटवले जाण्याची शक्यता आहे.

६. एकाच PAN वर अनेक NPS योजनांमध्ये गुंतवणूक

पीएफआरडीए (PFRDA) च्या नवीन मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) नुसार, NPS गुंतवणूकदारांना आता एका पॅन नंबरवरून अनेक स्कीममध्ये गुंतवणूक करता येईल. यापूर्वी फक्त एकाच योजनेत गुंतवणूक करता येत होती. गुंतवणूकदार त्यांच्या जोखीम क्षमतेनुसार Debt, Balanced किंवा Equity आधारित योजना निवडू शकतील.

७. PF खातेधारकांसाठी दिलासादायक माहिती

ऑक्टोबर महिन्यात पीएफ (PF) खातेधारकांना दोन महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. १०-११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून थेट एटीएमद्वारे पैसे काढता येतील, या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. किमान पेन्शनची रक्कम १,००० वरून १,५०० ते २,५०० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यावरही चर्चा होऊ शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) या महिन्यात आपली नवीन डिजिटल सेवा ‘EPFO 3.0’ देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राहुल गांधींना गोळ्या घालू.. भाजप प्रवक्त्याच्या विधानाने खळबळ, काँग्रेसचे थेट अमित शहांना पत्र

Next Post

अहिल्यानगरमध्ये मुस्लीम आंदोलकांवर लाठीचार्ज, नेमकं प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अहिल्यानगरमध्ये मुस्लीम आंदोलकांवर लाठीचार्ज, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगरमध्ये मुस्लीम आंदोलकांवर लाठीचार्ज, नेमकं प्रकरण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page