मुंबई : ओबीसी एल्गार मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“ओबीसी आणि मराठा भांडण सुरू आहे. तुम्ही जी भूमिका घेतली की, ओबीसींचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं हे आता राजकीय दृष्टीकोणातून मान्य झालं आहे. आता ते टिकवण्याचं राजकारण करावं लागेल.
दोन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेत ओबीसींचे १२ ते १३ खासदार गेले नाहीत तर आरक्षण टिकवणं कठिण राहिल. मग भुजबळांसारखी कितीही माणसं लढली तरी आपल्याला ठेंगाच मिळेल”, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
महात्मा फुले यांना जाऊन किती वर्षे झाली? १५० वर्षे तर झाली. आजही त्यांना शिव्या घातल्या जात आहे. आजही त्यांची निंदा नालस्ती केली जात आहे का? फुले दाम्पत्यांचा आजही चेष्टा केली जात आहे. का? तर या देशाची गुलामीची जी व्यवस्था होती. जाती प्रथेची व्यवस्था होती, स्त्री शिक्षणाविरोधी व्यवस्था होती ती उलथवून टाकण्याची त्यांनी सुरुवात केली. आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून कायम स्टँम्प मारला. ही व्यवस्था परत येणार नाही याची तजवीज केली”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Discussion about this post