मुंबई । राज्यभरामध्ये सध्या परिचारीकांचे आंदोलन सुरू असून या आंदोलनात १५ ते २० हजार परिचारिका सहभागी झाल्या आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन सुरूच राहिल असा इशारा देण्यात आला आहे.वेगवेगळ्या ७ प्रमुख मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहे.
राज्य परिचारिका संघटना आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील परिचारिका सहभागी झाल्या आहेत.यामुळे राज्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये परिचारिकासह नर्सेसही कामावर अनुपस्थित आहेत. नर्सिंग अलाउंस आणि जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होतोय. तर आमच्या मागण्या शासनाने तात्काळ मान्य न केल्यास आम्ही अजून आंदोलन तीव्र करू असा इशारा यावेळी परिचारिकांनी दिला आहे
परिचारीकांच्या नेमक्या मागण्या काय?
१) वेतन तृटी निवारण
२) नर्सेसचं खाजगीकरण बंद करा
३) नर्सिंग भत्ता मिळावा
४) गणवेश भत्ता मिळावा
५) १०० टक्के कायमस्वरूपी पदभरती आणि पदोन्नती व्हावी
६) शैक्षणिक वेतनवाढ मिळावी
७) खाजगीकरण दूर करावा
Discussion about this post