सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एनजीईएल) विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
एनटीपीसी ग्रीन एनर्जीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ११ एप्रिलपासून सुरु होणार आहे. या भरती मोहिमेत एकूण १८२ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखदेखील समोर आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही १ मे २०२५ पूर्वी अर्ज करु शकतात.या नोकरीबाबत वेबसाइटवर सविस्तर माहिती दिली आहे.
इंजिनियर (Engineer)(आरई-सिविल) पदासाठी ४० जागा रिक्त आहेत.इंजिनियर(आरई इलेक्ट्रिकल) साठी ८० पदे रिक्त आहे. इंजिनियर (आरई मेकॅनिकल)पदासाठी १५ जागा रिक्त आहे. कार्यकारी (एचआर) पदासाठी ७ पदे रिक्त आहे. कार्यकारी (फायनान्स)२६ पदे रिक्त आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
एनटीपीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड स्क्रिनिंग, लेखी परीक्षा आणि लेखी परीक्षा, इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. एनटीपीसी भारत अग्रणी विद्युत कंपनी आहे. या कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.
Discussion about this post