सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. असिस्टंट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात १५ फेब्रुवारीपासून झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर careers.ntpc.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
एनटीपीसीमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्र तपासणी आणि मेडिकल चेकअपनंतर केली जाणार आहे.सहाय्यक कार्यकारी पदासाठी भरती जाहीर केली आहे. ४०० रिक्त पदांवर ही भरती केली जात आहे. तुम्हाला ऑलाइन अर्ज करायचे आहे. भारतात कुठेही तुम्हाला नोकरीसाठी बोलावले जाऊ शकते.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये बीटेक केलेले असावे.
नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम WWW.ntpc.co.in या वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर करिअर सेक्शनमध्ये EET-2025 भरती यावर क्लिक करा.
यानंतर भरती मोहिमेत अर्ज करा. तुम्ही तुमची माहिती, शैक्षणिक माहिती भरा. यानंत कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर अर्ज सबमिट करा. त्यानंतर अर्जाची स्लीप डाउनलोड करा.
Discussion about this post