सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही खास तुमच्यासाठी. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनटीपीसीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०२५ आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती ntpc.co.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
एनटीपीसीमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ४०० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. एनटीपीसीमध्ये याआधी इंजिनियरिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी ४७५ रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या आहे. दरम्यान, त्यानंतर लगेचच एनटीपीसीमध्ये नोकरी भरती जाहीर करण्यात आली आहे. ()
एनटीपीसीमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात इंजिनियरिंग डिग्री प्राप्त केलेली असावी. याशिवाय उमेदवाराकडे गेट परीक्षेचे सर्टिफिकेट असायला हवे. या नोकरीसाठी तुम्ही उद्यापर्यंत अर्ज करु शकतात. एनटीपीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपासून ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
Discussion about this post