तुम्ही जर केंद्र शासनाच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून विविध पदांसाठी भरती पार पडतंय.या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही देखील जाहिर करण्यात आलीये.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून 130 पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट ही लागू करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ntpc.co.in या साईटवर जावे लागेल. येथून तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना मोठा पगार हा देखील मिळणार आहे.
या पदांसाठी होईल भरती :
ही भरती प्रक्रिया डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी पार पडत आहे.
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Electrical/Electrical & Electronics /Mechanical/ Production/ Electronics/Control & Instrumentation/Instrumentation) (ii) 10 वर्षे अनुभव
वयाची अट: 08 मार्च 2024 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे अगोदरच तपासा. या भरती प्रक्रियेसाठी फीस आणि अर्ज हे दोन्ही एकदाच दाखल करावे लागतील. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच अर्ज करा.















Discussion about this post