सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये बंपर जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही 20 डिसेंबर 2023 पासून अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावेततब्बल 100 जागांसाठी ही भरती होणार आहे. विशेष म्हणजे एनटीपीसी ही कंपनी भारतामध्ये सर्वाधिक वीज निर्मिती करणारी कंपनी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हे करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुमची निवड केली जाईल.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
विद्युत उभारणी – 30 पदे
यांत्रिक उभारणी – 35 पदे
नागरी बांधकाम – 35 पदे
वेतनमान : रु. 50,000/- ते रु. 1,60,000/- पर्यंत
वयश्रेणी : उच्च वयोमर्यादा SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे आणि PWD श्रेणीसाठी 10 वर्षे शिथिल आहे. माजी सैनिक आणि इतर, जर असेल तर – सरकार नुसार. नियम
शुल्क : या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 300 रूपये फिस ही तुम्हाला भरावी लागणार आहे
निवड प्रक्रिया:
निवड ऑनलाइन लेखी चाचणी किंवा कौशल्य चाचणी किंवा मुलाखत (जे आवश्यक असेल) द्वारे केली जाईल.
पात्र उमेदवारांना परीक्षा/मुलाखतीची नेमकी तारीख, वेळ आणि स्थळ योग्य वेळी कळवले जाईल आणि अशी माहिती NTPC लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल — www.ntpc.co.in.















Discussion about this post