सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. वेगेवगेळ्या विभागात ही भरती केली जाणार आहे. १८८ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे.
नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये उप महाप्रबंधक, सहायक प्रबंधक, एचआर पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला असावा.
वयाची अट: 30 नोव्हेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 15: 27 वर्षांपर्यंत
शुल्क : General/OBC/ExSM: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
या नोकरीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करायचा आहे. वेबसाइटवर तुम्हाला अर्जासंबंधित लिंक दिसेल. त्यावर क्लिक करुन फॉर्म भरावा लागेल. अर्ज शुल्क भरल्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होणार आहे. त्यानंतर तुम्ही प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |