न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एनपीसीआयएलमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
या भरतीद्वारे एकूण १२२ पदे भरली जाणार असून या नोकरीसाठी तुम्हाला npcil.nic.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२५ आहे.
पात्रता
एनपीसीआयएलमध्ये डेप्युटी मॅनेजर (एचआर), डेप्युटी मॅनेजर (F&A), डेप्युटी मॅनेजर(C& MM), डेप्युटी मॅनेजर (लीगल), ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी.डेप्युटी मॅनेजर पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन, एमबीए, एलएलबी आणि सीए पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी आधी अधिसूचना वाचावी.
वयोमर्यादा
डेप्युटी मॅनेजर पदासाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत.
सॅलरी
डेप्युटी मॅनेजर पदासाठी पे लेव्हल १०नुसार ५६,१०० रुपये दिले जाणार आहे. ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी लेव्हल ६ नुसार ३५,४०० रुपये पगार मिळणार आहे.















Discussion about this post