मुंबई | सध्या सर्वत्र ऑनलाइन बेटिंगसाठी प्रसिद्ध असलेले ‘महादेव बुक’ ॲपची चर्चा रंगली आहे. या अॅपद्वारे होणाऱ्या मनी लाँड्रिंग याप्रकरणी ईडीकडून कारवाई सुरू आहे. या प्रकरणात आता बड्या ३४ सेलिब्रिटींची नावे समोर आली असून त्यांना नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले.
रफ्तार, एम्सी दिप्ती साधवानी, सुनील शेट्टी, सोनू सूद, संजय दत्त, हार्डी संधू, सुनिल ग्रोव्हर, सोनाक्षी सिन्हा, रश्मिका मंधाना, सारा अली खान, गुरु रंधावा, टायगर श्रॉफ, कपिल शर्मा, नुसरत बरुचा, मलायका अरोरा, नोरा फतेही, रणबीर कपूर.. यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत.दरम्यान, सर्व सेलिब्रिटींची ईडीकडून कसून चौकशी होणार असल्यामुळे सर्वत्र खळबल माजली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सौरभ याने मित्र रवी उप्पल याच्यासोबत ‘ महादेव बेटिंग ॲप’ची सुरुवात केली. महादेव बेटिंग ॲप मिळत असलेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीसाठी एक दोन कोटी नाही तर, तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. याच महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अडकलेल्या सर्व सेलिब्रिटींची ईडीकडून चौकशी होणार आहे.















Discussion about this post