जळगाव । फेसबुकवर ओळख आणि तात्काळ लग्न करणारे जळगाव शहरातील तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. तरुणाची लग्न करुन त्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजेच तरुणाने ज्या तरुणीसोबत सात फेरे घेतले ती महिला नसून तृतीयपंथी निघाली. यामुळे तरुणासह त्याच्या कुटुंबियांच्या पायाखालील जमीनच सरकली.
आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने याबाबत दाद मिळावी म्हणून न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यानुसार बुधवारी न्यायालयाने सुनावणी करुन महिला असल्याचा बनाव करणाऱ्या तृतीयपंथीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले.
जळगाव शहरातील कांचननगरमधील मूळ रहिवासी असलेला तरुण १४ मार्च २०२३ रोजी मोबाईलवर खेळत असताना त्याच्या फेसबुक अकाउंटवर दिव्या पाटील या नावाने मुलीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली.ती त्याने स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये विचारांचे आदानप्रदान होऊन अवघ्या १५ दिवसांत दोघांनी लग्नाचा बार उडवून दिला. नवरा मुलगा याच्या वाढदिवसाचा मुहूर्त पाहून परिचितांच्या उपस्थितीत हा विवाह झाला.
विवाहानंतर दिव्या पाटील ‘पत्नीधर्म’ निभावण्यात कसूर करु लागली. तसेच पती असलेल्या तरुण व त्याच्या कुटुंबीयांशी गैरवर्तन करू लागली. शिवीगाळ करत भांडण करु लागली. त्यामुळे तरुण आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा त्रास होत होता.
८ मे रोजी तरुणीला तिची तब्येत बरी नसल्याने तरुणाच्या आईने जवळच्या दवाखान्यात नेले. याठिकाणीही तरुणीने डॉक्टरांना तपासणी करू देण्यास नकार दिला व टाळाटाळ करीत तिथून निघून गेली. यावेळी डॉक्टरांना शंका आली , त्यांनी तरुणाच्या आईशी बोलतांना सांगितले की, तुमच्या सुनेचे वर्तन स्त्रीप्रमाणे वाटत नाही. ती तृतीयपंथी असल्यासारखी वाटत आहे. तुम्ही तपासून घ्या. यानंतर तरुणीचं वास्तव रुप समोर आल्यानंतर तरुण आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून फसवणूक झाल्याबद्दल व कार्यवाही करण्याबद्दल कळविले आहे. त्यानंतर याबाबत दाद मिळावी म्हणून न्यायालयात सुद्धा खटला देखील दाखल केला आहे. त्यानुसार बुधवारी न्यायालयाने सुनावणी करुन महिला असल्याचा बनाव करणाऱ्या तृतीयपंथीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले.
Discussion about this post