जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतपेढीच्या सन 2023 ते 28 च्या कालावधी साठी झालेल्या निवडणुकीत डॉ. महेंद्र महाजन यांची अध्यक्षपदी डॉ.सोमनाथ वडनेरे यांची उपाध्यक्षपदी तर श्री अरुण सपकाळे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली
कार्यकारणीतील इतर सदस्यमध्ये श्री राजू सोनवणे, डॉ. दिनेश लाड, श्री संजय ठाकरे, श्रीअशोक पाटील, श्रीमती वैशाली शर्मा, सौ. जयश्री देशमुख, डॉ.अनिल लोहार, श्री दीपक गावित आदींचा समावेश आहे
पीएचडी विद्याविभूषित संचालक
या निवडणुकीत कार्यकारिणीवर प्रथमच चार पीएचडी विद्याविभूषित संचालकांची निवड झालेली आहे. सदर कार्यकारिणीचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असून मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री अजित पाटील यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड जाहीर केली.
Discussion about this post