जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची खेळाडू रिंकी पावरा हिची जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी भारतीय विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
जागतिक स्पर्धेसाठी ओडीसा मधील के आय आय टी भुवनेश्वर येथे दि १४ व १५ जून या दोन दिवशी निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे रिंकी पावरा (जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार) हिची चीन येथील चेंगडू येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत ५००० मीटर धावणे या मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याआधी ५००० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रिंकी पावरा हिला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील क्रीडा महोत्सवात व दक्षिण पश्चिम विभागीय स्पर्धेत कास्य पदक प्राप्त करुन ती अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरली. तसेच लखनौ येथे झालेल्या खेला इंडिया स्पर्धेतही तीने कास्य पदक प्राप्त केले आहे अशी माहिती क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी दिली.
Discussion about this post