कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांवर भरती निघाली असून याबाबत जाहिरात प्रसिद्द झाली आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत येत आहे.
या पदांसाठी होणार भरती :
१. वैद्यकिय अधिकारी For M.B.B.S.
२. वैद्यकिय अधिकारी For B.A.M.S.
३. विशेष कार्य अधिकारी (OSD) लेखा परिक्षण
४. उद्यान अधिक्षक
५. प्रोग्रामर
६. लॅब टेक्निशियन
७. केंद्र स्वयंसेवक (वरिष्ठ)
८. केंद्र स्वयंसेवक
९. एम.आय.एस. अधिकारी
शैक्षणिक अर्हता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी कृपया जाहिरात पाहावी
अर्ज करणाऱ्या वय किती असावे? :
या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय २५ वर्षे तर कमाल ४५ वर्षे असावे.
उमेदवारांसाठी महत्वाचं :
१. अर्जदाराने अर्जावर स्वतःचे नजीकच्या काळात काढलेले पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र चिकटवून स्वस्वाक्षांकित करावे.
२. सदर पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहील.
३. भरती प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व सेवकांवर उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
४. अर्जासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती स्वाक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे.
५. मुलाखतीसाठी अर्जदारांना स्वखचांने उपस्थित रहावे लागेल.
६. उमेदवाराचे वय किमान २५ वर्षे व कमाल ४५ वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा शासन नियमानुसार राहील.
७. उमेदवाराने अर्जात व अर्जासोबत दिलेली माहिती व कागदपत्रे खोटी असल्यास किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी नियुक्ती तात्काळ रदद करण्यात येईल.
८. अर्जाची स्विकृती किंवा तो नाकारणे याबाबत विद्यापीठामार्फत कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. ९. जाहिरातमध्ये नमुद पदे भरणे किया न भरणे याचा हक्क विद्यापीठाने राखून ठेवला आहे.
१०. जाहिरातीतील पदांच्या वेतनात अनुभव शिथिलता आणि पदसंख्या यात बदल करण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवलेले आहेत. ११. विद्यापीठ प्रशासन आपल्या कामाचा कालावधी, कामाचे स्वरुप व कामाचे स्थान यात बदल करण्याचे अधिकार राहतील.
१२. वरील पदावर करावाची नेमणूकही पुर्णत: कंत्राटी स्वरुपाची असून, निवड झालेल्या उमेदवारास विद्यापीठाच्या सेवेत हक्क सांगता येणार नाही,
१३. नियुक्त उमेदवारास कोणतीही आगाऊ सूचना व कारण न देता कामावरुन कमी करण्याचा अथवा त्यांची सेवा खंडित करण्याचा अधिकार विद्यापीठास राहील.
१४. प्रतिमाह मोबदल्याबाबत कोणतीही तक्रार ग्राहय धरली जाणार नाही.
१५. उमेदवाराची निवड झाल्यानंतर विद्यापीठात रूजू होण्यापूर्वी रु.१००/- च्या गैरन्यायिक मुद्रांकावर विहित नमुन्यातील करारनामा लिहून देणे बंधनकारक राहील, त्याशिवाय कामावर रुजू करुन घेतले जाणार नाही.
१६. नियुक्त झालेल्या उमेदवाराचे नियुक्ती कालावधीत कामाचे मुल्यमापनात त्याचे काम समाधानकारक असल्यास पुनर्नियुक्तीबाबत विचार करण्यात येईल.
१७. अ.क्र. १ पदासाठी M.B.B.S. अर्हता धारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास B.A.M.S. अहंता धारक उमेदवारास संधी देण्यात येईल…
मुलाखतीच्या तारखा :
पद १ ते ६ साठी मुलाखतीची तारीख सोमवार २९/०५/२०२३ सकाळी १० वाजता.
पद ७ ते ९ साठी मुलाखतीची तारीख मंगळवार ३०/०५/२०२३ सकाळी १० वाजता.
मुलाखतीचे स्थळ : कक्ष क्रमांक ४०१ तिसरा मजला, विद्यापीठ प्रशासकीय इमारत व्यवस्थापन परिषद सभागृह कबचौउमवि जळगाव
Notification : PDF
Discussion about this post