कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ६ जुलै २०२३ रोजी आहे.
भरतीद्वारे ही पदे भरली जाणार
१) महिला वैद्यकिय अधिकारी For B.A.M.S.
२) लॅब टेक्निशियन
३) ऑडीटर
४) OSD
५) ESD
६) टेस्ट सेंटर मॅनेजर
७) समन्वयक
शैक्षणिक अर्हता : या भरतीसाठी पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. कृपया यासाठी जाहिरात पाहावी
पगार : १०,०००/- ते ३५,००० हजार
अर्जदारांसाठी महत्वाचे :
१. अर्जदाराने अर्जावर स्वतःचे नजीकच्या काळात काढलेले पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र चिकटवून स्वस्वाक्षांकित करावे.
२. सदर पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहील.
३. भरती प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व सेवकांवर उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
४. अर्जासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती स्वाक्षांकित करुन जोडणे आवश्यक आहे.
५. मुलाखतीसाठी अर्जदारांना स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
६. उमेदवाराचे वय किमान २४ वर्ष व कमाल ५० वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा शासन नियमानुसार राहील. ७० वर्षापर्यंत वय असलेले सेवानिवृत्त अधिकारी सदर मुलाखतीस उपस्थित राहू शकतील.
७. उमेदवाराने अर्जात व अर्जासोबत दिलेली माहिती व कागदपत्रे खोटी असल्यास किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी/नियुक्ती तात्काळ रदद करण्यात येईल.
Notification Download Here
८. अर्जाची स्विकृती किंवा तो नाकारणे याबाबत विद्यापीठामार्फत कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
९. जाहिरातमध्ये नमुद पदे भरणे किंवा न भरणे याचा हक्क विद्यापीठाने राखून ठेवला आहे.
१०. जाहिरातीतील पदांच्या वेतनात अनुभव शिथिलता आणि पदसंख्या यात बदल करण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवलेले आहेत.
११. विद्यापीठ प्रशासन आपल्या कामाचा कालावधी, कामाचे स्वरुप व कामाचे स्थान यात बदल करण्याचे अधिकार राहतील.
१२. वरील पदावर करावाची नेमणूकही पुर्णतः कंत्राटी स्वरुपाची असून, निवड झालेल्या उमेदवारास विद्यापीठाच्या सेवेत हक्क सांगता येणार नाही.
१३. नियुक्त उमेदवारास कोणतीही आगाऊ सूचना व कारण न देता कामावरुन कमी करण्याचा अथवा त्यांची सेवा खंडित करण्याचा अधिकार विद्यापीठास राहील.
१४. प्रतिमाह मोबदल्याबाबत कोणतीही तक्रार ग्राहय धरली जाणार नाही.
१५. उमेदवाराची निवड झाल्यानंतर विद्यापीठात रूजू होण्यापूर्वी रु.१००/- च्या गैरन्यायिक मुद्रांकावर विहित नमुन्यातील करारनामा लिहून देणे बंधनकारक राहील, त्याशिवाय कामावर रुजू करुन घेतले जाणार नाही.
१६. नियुक्त झालेल्या उमेदवाराचे नियुक्ती कालावधीत कामाचे मुल्यमापनात त्याचे काम समाधानकारक असल्यास पुनर्नियुक्तीबाबत विचार करण्यात येईल.
Discussion about this post