सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी एनएलसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अरज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी. याचसोबत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या भरती मोहिमेत एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी १६७ रिक्त जागा आहेत. यातील मेकॅनिकल पदासाठी ८४ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी ४८ जागा तर सिविल इंजिनियर पदासाठी २५ जागा रिक्त आहे. तर कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन पदासाठी १० जागा रिक्त आहेत.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवारांनी nlcindia.in च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
वेबसाइटवर जाऊन करिअर टॅबवर क्लिक करायचे आहे.
यानंतर ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनीमध्ये क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतर शुल्क भरुन अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५४ रुपये अर्ज भरायचा आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३५४ रुपये अर्ज फी भरायची आहे.
Discussion about this post