पाटणा । बिहारमधील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज रविवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.बिहारमध्ये गेल्या दोन, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या प्रकरणाचा शेवट झाला आहे.
नितीश कुमार पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत गेल्यामुळे बिहारमध्ये पुन्हा सत्ताबदल होत आहे. आज संध्याकाळी नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे आहे. या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षही असणार आहे. नीतीश कुमार आज नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा ते शपथ घेणार आहेत.
Discussion about this post