मणिपूर । भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठा धक्का बसल आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल यूनायटेड (जेडीयू) ने मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्वातील बिरेन सिंह यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे.
मणिपूर विधानसभेच्या 2022 च्या निवडणुकीत जेडीयूने सहा जागांवर विजय मिळवला होता, परंतु त्यातील पाच आमदार यापूर्वीच भाजपमध्ये सामील झाले होते. आता जेडीयूचा एकमेव उरलेला आमदारही भाजपला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. यामुळे भाजप सरकारला कोणताही तात्कालिक धोका नसला तरी, हा निर्णय राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मणिपूर विधानसभेची एकूण सदस्य संख्या 60 आहे, त्यामध्ये भाजपचे 37 आमदार आहेत. जेडीयूच्या पाठिंबा वापस घेण्याने सरकारची स्थिरता बाधित होणार नाही, मात्र नितीश कुमार यांचा हा निर्णय केंद्र सरकारला संदेश देण्याचा प्रयत्न मानला जात आहे. कारण सध्या जेडीयू केंद्रात एनडीए सरकारसोबत आहे.
Discussion about this post