नवी दिल्ली । भाजपने १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली. ४५ वर्षीय नितीन नबीन हे भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नितीन नबीन यांचे पीएम मोदी यांनी अभिनंदन केले. नितीन नबीन यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यापूर्वी नितीन नबीन यांनी दिल्लीतील विविध मंदिरांना भेट देत दर्शन घेतले. त्यांनी गुरुद्वारा बांगला साहिब, झंडेवालन मंदिर, वाल्मिकी मंदिर आणि कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिराला भेट दिली आणि पूजा केली.
पीएम मोदी यांनी नितीन नबीन यांचे कौतुक करत सांगितले की, ‘भाजप हा असा पक्ष आहे जिथे लोकांना वाटेल की मोदीजी इतक्या लहान वयात मुख्यमंत्री झाले. ते सरकारचे प्रमुख झाले आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पण मला वाटते की नितीनजी माझे बॉस आहेत मी एक कार्यकर्ता आहे.’















Discussion about this post