जळगाव । माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आज जळगावमध्ये आहेत. इथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार गटाच्या नेत्याला सुनावलं आहे. तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही पृथ्वीराज चव्हाणांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी एक मोठा दावा केला. काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदाचे 10 उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसला 288 जागा लढवल्याशिवाय पर्याय नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेसला एकटे पाडतील, अशी काँग्रेसला भीती आहे. त्यामुळे काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असं म्हटलं. त्याला पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर दिलं आहे. आमच्यात आपसमध्ये भांडणं लावण्याचं काम आणि प्रयत्न कुणी करू नये, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
आम्ही तिन्ही पक्ष सर्व नॉन पॉलिटिकल संघटनांना एकत्र येऊन पुन्हा ताकदीने विधानसभा निवडणूक लढणार आहेत. महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यायचा असेल तर हे अन्यायकारक आणि भ्रष्ट सरकार लवकरात लवकर घालवले पाहिजे, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रत्येक मतदार संघात आम्हाला ताकद वाढव्याची आहे. याशिवाय मी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत कशी करणार? आम्हाला महविकस आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करायचं आहे. ज्या पद्धतीने आम्ही लोकसभा लढलो..त्याच पद्धतीने आम्ही सर्व एकत्र विधानसभा निवडणूक लढणार आहोत, असं म्हणत आगामी निवडणुकीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.















Discussion about this post