सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) मध्ये सुवर्णसंधी आहे. असिस्टंट (क्लास III) या पदासाठी ही भरती होणार असून या भरतीद्वारे एकूण 500 जागा भरल्या जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
आवश्यक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी, उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे. १ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाची गणना केली जाईल. तर आरक्षित प्रवर्गांना उच्च वयोगटात सवलत दिली जाईल.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 850 रूपये शुल्क आकारले जात आहे.
तर, एससी/ एसटी/ इएक्सएसएम कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जात आहे.
अधिक माहितीसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अधिकृत वेबसाइट https://nationalinsurance.nic.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
महत्त्वाची अपडेट
परीक्षा (Phase I): 30 नोव्हेंबर 2024
परीक्षा (Phase II): 28 डिसेंबर 2024















Discussion about this post