नॅशनल इश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत एनआयसीएलमधील या नोकरीसाठी nationalinsurance.nic.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०२५ आहे.
नॅशनल इश्युरन्स कंपनी लिमिटेड (NICL) मध्ये एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर या पदांसाठी ही भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा २० जुलै २०२५ रोजी होण्याची शक्यता आहे. फेज २ परीक्षा ३१ ऑगस्ट रोजी होऊ शकते.
पात्रता :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन / बीई / बीटेक / एमई/ एमकॉम / सीए / लॉमध्ये ग्रॅज्युएशन / एमबीबीएस / एमएस / पीजी पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
नोकरीसाठी अर्ज कसा करावा? (How To Apply)
नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला nationalinsurance.nic.co.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर रिक्रूटमेंट सेक्शनवर जाऊन भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करायचे आहे.
यानंतर रजिस्ट्रेशन करायचे आहे. तुमची सर्व माहिती भरायची आहे.
रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर शुल्क जमा करुन फॉर्म सबमिट करायचा आहे.
या फॉर्मची प्रिंट आउट तुम्ही तुमच्याजवळ ठेवा.
Discussion about this post